आगामी लेखसंग्रह : "इतिहासाच्या पाऊलखुणा"

बाजीराव पेशव्यांचे राजकारण

एकंदरीत इतिहासातले कागद बघता हेच बोलतात की ……
बाजीरावसाहेब पेशव्यांच्या कारभाराची सुरुवात फार वेगळ्या परीस्थित झाली ,१७२० साली पेशवे पदावर आलेले बाजीराव हे कायम उत्तरेतल्या बदलत्या राजकारणावर बारीक लक्ष देत होते , निजाम आणि बादशाह ,सय्यदबंधू यांच्यातला तेढा या वीराने टिपला होता ,सय्यदबंधूच्या पडावानंतर निजाम आणि बादशाह यांच्यात झालेल्या फत्तेखर्डे च्या लढाई नंतर तर बाजीराव याने निजामाची बाजू घ्यायला सुरुवात झाली होती ,मुळात शाहूराजाना जरी चौथाई ,देशमुखीच्या सनदा मिळाल्या होत्या तरीही प्रत्यक्षात वसुली व्हायला बरीच कसरत करावी लागे. .

https://scontent.fbom1-1.fna.fbcdn.net/hphotos-xap1/t31.0-8/s720x720/12052501_955272834518621_7915488689415614682_o.jpg

१७२४ ला निजामाची सरशी झाल्यावर ,चिमाजीअप्पा यांनी बाजीराव यांना निजामभेटीत करावयाच्या गोष्टी स्वतः लिहून पाठवल्या त्यात बाजीरावांनी कर्नाटकात जावे ….यातून बाजीरावाची खुमखुमी दिसते ,हालचाल करायची हीच वेळ योग्य होती ,कारण जरी निजामाने बंडखोरी केली असली तरी बादशाहाशी तो प्रेमाने वागे म्हणून बादशाहने त्याची नेमणूक मान्य केली ….

पुढे यातूनच बाजीरावाने निजामाला पक्के ओळखले ,सन १७२४-२५ सालं हे कर्नाटकात गेल्याने ,एकाचं क्षेत्रात निजाम आणि बाजीराव यांचा वावर झाला ,संपूर्ण भागावर पेशव्याचे लक्ष हवे हा हेतू बाजीरावसाहेबांचा होता …. त्याची परिणीती अशी झाली ,मराठे हे स्वतःच्या सामर्थ्याने लढू शकतात हे लक्षात आलं … पुढे १७२९ साल उजाडले आणि ते मराठ्यांच्या इतिहासात सुर्वण अक्षरात नोंदवावे असे ठरले ….