आगामी लेखसंग्रह : "इतिहासाच्या पाऊलखुणा"

नानासाहेब पेशवे आणि तुळाजी आंग्रे !!

नानासाहेब पेशवा आणि तुळाजी आंग्रे यांच्यातल्या वादावर बर्‍याच जणांचे मतमतांतरे आहेत, मुळात आंग्रेयांचा इतिहास हा एका रियासतीचा इतिहास आहे हे मान्य करावं लागेल, या कोकणच्या भूप्रदेशात इंग्रज, डच, पोर्तुगीज, आंग्रे, कोल्हापूरकर, सातारकर होते, त्यामुळे  केवळ एका गोष्टीवरून एका अंगाने निष्कर्ष काढणे फार कठीण जाते … 

बाजीराव पेशव्यांचे राजकारण

एकंदरीत इतिहासातले कागद बघता हेच बोलतात की ……
बाजीरावसाहेब पेशव्यांच्या कारभाराची सुरुवात फार वेगळ्या परीस्थित झाली ,१७२० साली पेशवे पदावर आलेले बाजीराव हे कायम उत्तरेतल्या बदलत्या राजकारणावर बारीक लक्ष देत होते , निजाम आणि बादशाह ,सय्यदबंधू यांच्यातला तेढा या वीराने टिपला होता ,सय्यदबंधूच्या पडावानंतर निजाम आणि बादशाह यांच्यात झालेल्या फत्तेखर्डे च्या लढाई नंतर तर बाजीराव याने निजामाची बाजू घ्यायला सुरुवात झाली होती ,मुळात शाहूराजाना जरी चौथाई ,देशमुखीच्या सनदा मिळाल्या होत्या तरीही प्रत्यक्षात वसुली व्हायला बरीच कसरत करावी लागे. .

मराठ्यांच्या केंद्रीय प्रशासकीय व्यवस्थेतील बदल : भाग १

कागदपत्रांवरून असे दिसते की ,साधारण शिवकाळ म्हणजे १७ व शतक आणि शाहुकाळ म्हणजे १८ व शतक , यात खूप फरक आहे , मराठ्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीत बरेच फरक पडले आहेत ,आपण जर ते समजून घेवू शकलो ,तर १७ व्या शतकाची ,१८ व्या शतकाशी तुलना बघू शकू …. काय होते हे फरक ,कशामुळे पडले हे फरक ?