आगामी लेखसंग्रह : "इतिहासाच्या पाऊलखुणा"

गोष्ट फोंड्याच्या किल्ल्याची

संभाजीराजांची फोंड्याची लढाई प्रसिद्ध आहेच ,यात किल्लेदार येसाजी कंक यांचे चिरंजीव कृष्णाजी कंक कमी आले होते, याच किल्ल्याबाबत पुढे उल्लेख मिळतात ते असे-

कारवारकर इंग्रज ,सुरतेला ६ डिसेंबर १६८३ रोजी लिहितात "संभाजीने फोंड्याचे कोट मोडून जवळच एक गड बांधला आहे"

पुढे एक इटालियन प्रवासी जेमिली कारेरी १६९५ ला फोंड्यात आला होता ,त्याने लिहिले आहे "विजरई कोंदी द अल्व्हारो याने बारा वर्षामागे फोंड्यावर हल्ला करून थोड्याच वेळामध्ये तेथे मोठे भगदाड पाडले व त्यामुळे संभाजीने फोंड्याचा किल्ला मोडून तेथील दगड मर्दनगड " किल्ला बांधण्यास वापरले. पुढे इसवी सन १७६३ साली गोव्याचा विजरई कोंदी द येग याने हल्ला करुन तो घेतला व पाडुन टाकला असा उल्लेख Os Portugueses no Oriente ह्या पुस्तकात मिळतो . .

संपूर्ण संदर्भ :- पोर्तुगीज मराठे संबध :- पिसुर्लेकर , पान १०३,१७