आगामी लेखसंग्रह : "इतिहासाच्या पाऊलखुणा"

मस्तानीचे रहस्य !!

एकंदरीत "मस्तानी " हा विषय मराठी रियसतीच्या काळात कायमच एक गूढ बनून राहिला आहे , मस्तानी नेमकी कोण होती याची पूर्ण माहिती कळलिये असे दिसत नाही ,काही जण ती छत्रसालच्या रक्षेची कन्या म्हणतात ,तर काही जण बाहेरून दिलेली भेट असेही म्हणतात.


१७३० साली नानासाहेब पेशव्यांच्या लग्नात " मस्तान कलावंत " असा उल्लेख येतो(पेशवे दप्तर ३०.३६३),त्या नंतर एक इसम बाजीरावसाहेबाना लिहितो " आपल्यापासी मस्तान आहे येणेकरून आम्हास समाधान आहे " तर तरीखी महमदशही मध्ये असे विधान आहे " मस्तानी कंचनी असून ती अश्वारोहाणात विशेष कुशल होती ,ती मोहिमेत बाजीरावासोबत हजार असे (भाग १ ,पान ४१३) , परंतु १७३६ सालच्या बाजीरावसाहेबांच्या सोबत ,काशीबाई होत्या असे दिसते ,त्यांनी दोहोंनी मिळून देवदर्शन घेतल्याचा उल्लेख मिळतो (पे द ३०,१५६) त्यामुळे प्रत्येक स्वारीत मस्तानीबाईसाहेब होत्याच का ? हे मात्र इतिहासाला माहित . काहींनी तर छत्रसाल हा प्रणामी पंथाचा संस्थापक पुरस्कर्ता असल्याने ,त्याच पंथातली मस्तानी वाटते , पुढे नानासाहेबाने समशेरबहादुरचे लग्न दलपतराय याच्या मुलीशी लावून दिल्याचेही उल्लेख सापडतात . . परंतू मस्तानी नक्की कोण हे मात्र कळायला मार्ग दिसत नाही. 

१७३९ नोव्हेंबर महिन्यात चिमाजी अप्पाने मस्तानीभोवती पहारे लावले ,परंतु २४ नोव्हे १७३९ ला मस्तानी तिथून पळून बाजीरावाकडे निघून आली ,"मस्तानी येथून गेली" असे नानासाहेब लिहितात, परंतु या एक गोष्ट अशी दिसते की ,तिचा उल्लेख अरे तुरे असा सामाकालात न शोभणारा असा आहे ,यावरून मस्तानीचे पेशवे कुटुंबातील स्थान कळते . 

मस्तानी पळून गेल्यानंतर सामास्तानी बाजीराव अनो मस्तानी साहेबाना परत पाटस ला जावून समजावून पुण्यात आणले , मग पुन्हा एकदा चिमाजी अप्पांच्या सांगण्यावरून जानेवारी १७४० ला पार्वतीत नानासाहेबांनी युक्ती करून कैद केले , मस्तानी शेवट पर्यंत कैदेत असावी असे वाटते. यानंतर बाजीरावसाहेब उत्तरेत गेले , पेशवे शाकावालीत "श्रीमंत विषयलंपट झाले ,यामुळे चिमाजी अप्पांशी अंतर पडून निघून नर्मदातीरी गेले " असा उल्लेख मिळतो , याच सुमारास नसीरजंग याच्याशी युध्द झाल्यानंतर ,राऊ आणि चिमाजी अप्पा यांचे बोलणे झाले , २९ मार्च १७४० ला आप्पा पुण्यात लिहितात " चाले तो यत्न केला ,परंतु ईश्वराचे चित्तास नये त्यावर आमचा उपाय काय ?आम्ही पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्याजकडे करावी ,आपले निमित्त वारावे " त्यामुळे २९ मार्चपर्यंत मस्तानी आणि राऊ एकत्र नव्हते असे नक्की दिसते ,पुढे २८ एप्रिल ला राऊ निजधामी गेले , तेव्हा काशीबाईसाहेब ह्या राऊसोबत होत्या हे रोजनिशीतून आपल्याला कळते ,त्यामुळे काशीबाई सोबत मस्तानीला घेऊन निघाल्या ,की त्या एकट्याच गेल्या हे मात्र कळावयास मार्ग नाही ,परंतु पुणे ग्याझेटियर मध्ये "मस्तानी शनिवार वाड्यात वारली ,आणि तिला पाबळ येथे दफन करण्यात आले " असे उल्लेख मिळतात ,परंतु काशिबाईचे "आम्हास ठेवले आहा ,त्याप्रमाणे कुशल अहो " हे उपरोधिक विधान मस्तानीबाबतचे मत दर्शवते, त्यामुळे मस्तानी काशीबाईंच्या सोबत असण्याची शक्यता कठीण वाटते. 

मस्तानी साहेब शनिवारवाड्यात वारल्या हे पुणे ग्याझेटियरचे विधान गृहीत धरण्यासारखे वाटते परंतु "आणि तिला पाबळ येथे दफन करण्यात आले" हे लक्षात घेतले तर शनिवारवाडा ते पाबळ हे अंतर ६० किमी असून ,इतक्या लांब तिचा मृतदेह घेवून जाणे थोडे जिकरीचे आणि त्याकाळचा विचार करता अशक्य वाटते,अजून म्हणजे पाबळचे आज दिसणारे मस्तानीची समाधी, ही मेहरबाईची कबर म्हणतात ,ही मेहेरबाई म्हणजे सामाशेराची बायको होती, त्यामुळे तिची ती कबर असण्याचा अंदाजही आहे. 

मस्तानी प्रकरणाची दखल खुद्द शाहूराजांना घ्यावी लागली , थोडक्यात मस्तानी हा भाग तत्कालीन काळात अतिशय गाजलेला होता ,यातून समकाळातील सामाजिक ,कौटुंबिक ,राजकीय विचार दाखवतो ,अगदी आज २५० वर्षांनी हे विचार अजूनही १००% समाजमान्य नाही ,त्यामुळे त्याकाळात बाजीरावसाहेबांना हा विरोध होणे स्वाभाविक वाटते . . एकंदरीत हे प्रकरण कायम गूढ बनून राहील. .